Chhagan Bhujbal, Sanjay Raut  Pudhari
नाशिक

Chhagan Bhujbal | 'त्यावेळी शिंदे ज्युनिअर होते', भुजबळांच्या वक्तव्यानंतर राऊतांच्या दाव्याला पाठबळ

Chhagan Bhujbal | जरांगेंमुळे निवडणुकीत फटका बसल्याचे केले कबुल

गणेश सोनवणे

पुढारी ऑनलाइन डेस्क | शरद पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाला शरद पवार व अजित पवार या दोघाही काका पुतण्याचा विरोध होता असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, या दाव्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टिका केली. राऊत हेच पाच वर्षापूर्वी का बोलले नाहीत, त्यांना हे आताच का सुचलं. असा सवाल शिंदे गटाच्या नेत्याने केला.

तर दुसरीकडी मात्र राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांच्या या दाव्याचे एकप्रकारे समर्थन केल्याचे दिसते. छगन भुजबळ यांना राऊत यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता त्यावेळी 'एकनाथ शिंदे हे खरोखर ज्युनिअर होते. त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादीत अनेक नेते सिनिअर होते असे भुजबळांनी म्हटलं आहे. त्यामुळे भुजबळांनी शिंदे गटाच्या नेत्यांचा दावा खोडून राऊतांच्या दाव्याला समर्थन दिल्याची चर्चा आहे.

भुजबळ म्हणाले, काका-पुतण्यांनी काय केलं? हे माहिती नाही. परंतु मी असं ऐकलं आहे की, आमदारांना सांभाळण्यासाठी ज्येष्ठ आणि प्रमुख माणूस त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. हे खरच आहे, मंत्रिमंडळात अनेक सिनिअर लोक होते. त्यावेळेस एकनाथ शिंदे हे ज्युनिअर होते. मी 91 पासून मंत्री आहे तसेच अजित पवार हे देखील 93 पासून मंत्री आहेत. मग, अशा वेळी त्यांनी हे म्हटलं हे सगळं सांभाळायचं असेल तर सिनिअर व्यक्ती कोणीतरी पाहिजे. हे म्हणाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं छगन भुजबळ म्हणाले.

जरांगेंमुळे फटका बसला

दरम्यान सर्वाच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेल्या निर्देशांनंतर येवला मतदारसंघात होत असलेल्या मॉक पोल वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर विचारले असता भुजबळ म्हणाले, मॉक पोल काय आहे ते मला माहिती नाही. काय करायचं ते करा. मी ते वाचलं आहे. मला जर ईव्हीएमचा फायदा मिळाला असता तर मी दीड-दोन लाख मतांनी निवडून आलो असतो. 60 हजार मतांनी मी नेहमीच निवडून आलो. या वेळेला केवळ जरांगेमुळे माझे मताधिक्य कमी झाले. ईव्हीएम मध्ये गडबड असती, तर जरांगे येऊ आणि आणखी कोणी येऊ ईव्हीएमने उलटा सुलटा करून मला दीड ते दोन लाख मताधिक्यावर पोहोचवले असते असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT