Bribe Case Pudhari
नाशिक

Chandwad bribe case: चांदवड तालुक्यात मंडळ अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

ही कारवाई मंगळवार (दि. ५) रोजी सायंकाळी सोग्रस येथे करण्यात आली असून, या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे

पुढारी वृत्तसेवा

Chandwad bribe case

चांदवड : चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथील मंडळ अधिकारी योगिता आनंद भोंये (वय ३८) यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवार (दि. ५) रोजी सायंकाळी सोग्रस येथे करण्यात आली असून, या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या खडकओझर येथील वडिलोपार्जित शेतजमिनीच्या ताब्याबाबत न्यायालयीन वाद सुरू होता. न्यायालयाने संबंधित जमीन तक्रारदारांच्या ताब्यात देण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. या प्रक्रियेसाठी आवश्यक नोंदी पूर्ण करून जमीन ताब्यात देण्यासाठी मंडळ अधिकारी योगिता भोंये यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी तसेच तलाठी यांच्या नावाने ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. नंतर तडजोड होऊन ही रक्कम ५० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी सोग्रस येथे ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारताना योगिता भोंये यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे आणि पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT