Nashik Road railway station 
नाशिक

Nashik Railway Station | कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेचा महाप्लॅन! नाशिक परिसरातील 5 स्थानकांवर पायाभूत सुविधांच्या कामांना वेग

Nashik Railway Station | सिंहस्थाची तयारी : भाविकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांना प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प/लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नाशिक परिसरातील देवळाली, नाशिकरोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे -सुकणे या पाच महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकासाची कामे हाती घेतली आहेत. कुंभमेळ्याला देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवासी सुविधा, रेल्वे संचालन क्षमता आणि गर्दी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ही कामे सुरू आहेत.

रेल्वेकडून अतिरिक्त प्रवासी प्लॅटफॉर्म, यार्ड पुनर्रचना, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली, अतिरिक्त लूप व स्टेबलिंग लाइन्स, फूट ओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्म शेड, प्रतीक्षालये, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे तसेच कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात येत आहेत.

होल्डिंग एरिया, पाणीपुरवठा, स्वच्छता सुविधांवर भर कुंभमेळा काळात प्रभावी गर्दी व्यवस्थापनासाठी सर्व पाच स्थानकांवर स्वतंत्र होल्डिंग एरिया विकसित केले जात आहेत. अतिरिक्त स्वच्छतागृहे, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उंचावरील व भूमिगत टाक्या, प्रवासी निवाराशेड्स आणि परिसंचरण क्षेत्रांचा विकासही केला जात आहे.

नाशिकरोडवर गर्दी व्यवस्थापनाला प्राधान्य

नाशिकरोड स्थानकाचा विकास कुंभमेळ्यातील प्रमुख प्रवासी केंद्र म्हणून केला जात आहे. यामध्ये दोन नवीन फूट ओव्हरब्रिज, प्लॅटफॉर्मवरील शेडचा विस्तार, अतिरिक्त पाणीपुरवठा सुविधा, स्वच्छतागृहे आणि परिसर सुशोभीकरणाचा समावेश आहे. शाहीस्नानाच्या दिवशी होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षित प्रवासी हालचालींवर विशेष भर देण्यात येत आहे.

ओढा स्थानकासाठी भूसंपादन

पूर्ण ओढा स्थानकावर अतिरिक्त लूप लाइन्स, सहा स्टेबलिंग लाइन्स, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फूट ओव्हरब्रिज आणि होल्डिंग एरिया उभारले जात आहेत. सुमारे ३.४३ हेक्टर जमीन संपादन पूर्ण झाले असून, १९ मे २०२६ रोजी संबंधित जमिनीचा ताबा रेल्वेला मिळाला आहे.

देवळाली स्थानकावर बहुआयामी कामे

देवळाली स्थानकावर अतिरिक्त उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, स्टेबलिंग सुविधा, १०० केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, फूट ओव्हरब्रिज आणि होल्डिंग एरियांचे काम प्रगतिपथावर आहे. सुमारे ५५५ मीटर लांबीच्या नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम सुरू असून, इंटरलॉकिंग प्रणालीसाठी आवश्यक इमारतींची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत.

कसबे सुकणे स्थानकाचाही विकास

कसबे सुकणे येथे अतिरिक्त लूप व स्टेबलिंग लाइन्स, फूट ओव्हरब्रिज, प्लॅटफॉर्म विकास आणि होल्डिंग एरिया उभारणीची कामे सुरू आहेत. जमीन संपादन प्रक्रियेत संयुक्त मोजणीची कामे पूर्ण झाली असून, ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT