आशापुरी महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रियंका भूषण कोठावदे  Pudhari News network
नाशिक

CBFC | केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या सल्लागार समिती सदस्यपदी प्रियंका कोठावदे

Nashik : देवळा येथील प्रियंका भूषण कोठावदे यांची CBFC सदस्यपदी निवड

पुढारी वृत्तसेवा

देवळा : येथील आशापुरी महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रियंका भूषण कोठावदे यांची CBFC (Central Board of Film Certification) केंद्रिय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या सल्लागार समिती सदस्यपदी भारत सरकार तर्फे तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.

केंद्रिय चित्रपट प्रमाणन मंडळ ही माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत असलेली संस्था असून, संस्था सिने मॅटोग्राफर कायदा 1952 अंतर्गत जारी केलेल्या तरतुदींनुसार चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनावर नियंत्रण ठेवते. चित्रपट प्रमाणन मंडळावर ग्रामिण भागातून निवड झालेल्या प्रियंका कोठावदे ह्या एकमेव महिला गायिका ठरल्या आहेत. देवळा येथील आशापुरी महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रियंका या उत्कृष्ट गायिका असून, युट्युबवर त्यांनी आपल्या मधुर आवाजात गाणी प्रसिद्ध केली आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांच्या गाण्यांना पसंती दिली आहे. गायिका कोठावदे या युवा व्यावसायिक भूषण कोठावदे यांच्या पत्नी तर देमको बँकेच्या चेअरमन कोमल कोठावदे, अमृतकार पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन भारत कोठावदे यांच्या त्या भावजाई होत. कोठावदे यांची केंद्रिय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार डॉ राहुल आहेर, फेडरेशनचे राज्य संचालक केदा आहेर, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, डॉ. प्रशांत निकम, राजेंद्र वडनेरे, योगेश वाघमारे आदींसह तालुका व जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT