लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार Pudhari File Photo
नाशिक

Sinnar Crime News | लग्नाचे आमिष, गर्भपात करून तरुणीची फसवणूक

Sinnar Crime News | लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवत तिच्याकडून वारंवार गर्भपात करून घेतल्याचा आरोप असलेल्या युवकाविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवत तिच्याकडून वारंवार गर्भपात करून घेतल्याचा आरोप असलेल्या युवकाविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयवंत रवींद्र ठाकरे (रा. अकन्टमोराणे, ता. जि. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात ते सिन्नरमधील विविध ठिकाणी एकत्र राहत होते. आरोपीने लग्नाचे आश्वासन देत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून पीडित महिला दोन वेळा गर्भवती राहिली असता तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणल्याचा आरोप आहे.

तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर २ जून रोजी पुणे येथे विवाह करण्यासाठी जमा केलेली रक्कम घेऊन आरोपी फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी घटनास्थळाची व वैद्यकीय तपासणी केली असून, आरोपीचा मोबाइल २ जूनपासून बंद आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत तपास पथके पाठवून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT