MHT CET Engineering Pudhari
नाशिक

MHT CET Engineering | इंजिनिअरिंग कॅप फेरी - 1 चे जागावाटप सुरू; जागा स्वीकृती अहवाल बंधनकारक"

MHT CET Engineering | जागा स्वीकृती अहवाल बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. केंद्रीय प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीचे जागावाटप रविवारी (दि.२) जाहीर होणार आहे. जागावाटप झालेल्या उमेदवारांनी दि. ३ ते ५ ऑगस्टदरम्यान आपली जागा ऑनलाईन स्वीकारून संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

पहिल्या फेरीनंतर दि. ६ ऑगस्ट रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल. दुसऱ्या फेरीसाठी दि. ७ ते ९ ऑगस्टदरम्यान नवीन पसंतीक्रम भरता येणार आहे. दि. १२ रोजी ऑगस्टला तात्पुरते जागावाटप जाहीर होईल. दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना दि. १३ ते १७ ऑगस्टदरम्यान प्रवेश निश्चित करता येतील. तिसऱ्या फेरीसाठी दि. १९ ते २१ ऑगस्टदरम्यान पसंतीक्रम नोंदवता येतील.

या फेरीचे तात्पुरते जागावाटप २४ ऑगस्टला जाहीर होईल. त्यानंतर अंतिम टप्प्यात फेरी - ४ आणि अंतिम अहवाल सादर करण्याची प्रक्रिया दि. ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान पार पडणार आहे. याच कालावधीत संस्थास्तरीय प्रवेशप्रक्रियाही दि.७ सप्टेंबरपर्यंत चालेल. राज्यातील संपूर्ण अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया १३ सप्टेंबरला पूर्ण होणार आहे.

ही सर्व प्रवेशांसाठी अंतिम मुदत असेल. विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची मुदत लक्षात ठेवून, वेळेत आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

जागावाटप, प्रवेशासंबंधी सूचना, बदललेले वेळापत्रक तसेच इतर अद्ययावत माहिती उमेदवारांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित तपासावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेशप्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे

सीईटी सेलमार्फत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू, पात्र उमेदवारांनी मुदतीत प्रक्रिया पूर्ण करणे, कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे, महाविद्यालय व शाखा प्राधान्यक्रम लॉक करणे, गुणवत्ता यादीनुसार कॅप फेऱ्यांत प्रवेशवाटप, महाविद्यालयात मुदतीत प्रवेश निश्चित करणे, रिक्त जागांसाठी पुढील फेऱ्यांत संधी उपलब्ध.

मार्गदर्शक तत्त्वे (शाखांनिहाय उपलब्ध जागा)

  • एकूण महाविद्यालये - ३८०

  • एकूण क्षमता - २,१६,५५२

  • कॉम्प्युटर इंजिनिअरिंग - ३०,९९३

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग - २४,४८१

  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन - २१,८२१

  • कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग - २०,४२३

  • सिव्हिल इंजिनिअरिंग - १७,५००

  • इन्फॉर्मेशन तंत्रज्ञान (IT) - १६,४२८

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - १४,४५१

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स - ११,४०९

  • एआय अँड मशीन लर्निंग - ६,९९९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT