नाशिक : गौरव अहिरे
राज्यात मागील वर्षी सर्वाधिक वाहन खरेदी झाली आहे, तर 2018 सालच्या तुलनेने 2024 मध्ये सुमारे सहा टक्के जादा वाहन खरेदी झाल्याने नवीन वाहन खरेदीचा 'टॉप गिअर' पडला आहे. 2024 मध्ये राज्यात 28 लाख 87 हजार 898 वाहने खरेदी झाली आहेत. त्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
वाहननिहाय खरेदी
दुचाकी - 20,50,513
तीनचाकी - 80,898
कार - 4,49,235
अवजड वाहने - 2,25,769
कॅब - 51,546
वाढते शहरीकरण, लोकसंख्या, रस्ते यामुळे नागरिकांकडून वाहनांचा वापर वाढला आहे. त्यातही खासगी वाहनांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. वाहनांमुळे कामे जलद होत असल्याने अनेकांनी दुचाकी वाहन खरेदीस प्राधान्य दिले आहे. वाहनांसाठी कर्ज उपलब्धता सहज असल्याने नागरिक वाहन खरेदीसाठी उत्सुक असतात. त्यामुळे दरवर्षी वाहन खरेदीचा आलेख चढता आहे.
2009 ते 2024 या 15 वर्षांच्या कालावधीत राज्यात 3 कोटी 47 लाख 83 हजार 260 वाहनांची खरेदी झाली आहे. त्यात 2018 ला 27 लाख 10 हजार 716 वाहनांची खरेदी झाली होती. मात्र, त्यानंतर वाहन खरेदीचा आलेख घसरला होता. 2020 मध्ये कोरोना प्रादुर्भाव असल्याने 17 लाख 75 हजार 110 वाहनांची खरेदी झाली. त्यानंतर पुन्हा वाहन खरेदीचा आलेख चढता राहिला असून, राज्यात 2024 सर्वाधिक 28 लाख 87 हजार 898 वाहनांची खरेदी करण्यात आली.
भारत स्टेज सहा - 25,33,804
भारत टर्म स्टेज तीन ए - 83,078
सीईव्ही स्टेज चार - 7,397
भारत स्टेज तीन सीईव्ही - 5,048
टर्म स्टेज पाच - 1,932
युरो 6 - 309
टर्म स्टेज पाच - 284
सीईव्ही स्टेज पाच - 228
भारत स्टेज तीन - 127
माहिती उपलब्ध नाही - 2,55,625
पेट्रोल - 19,66,030
पेट्रोल-सीएनजी - 1,67,596
ईव्ही - 86,848
पेट्रोल-इथेनॉल - 59,081
पेट्रोल-हायब्रीड - 28,068
स्ट्राँग हायब्रीड ईव्ही - 8,936
एलपीजी - 6,965
पेट्रोल एलपीजी - 175
हायब्रीड ईव्ही - 12
इतर - 13,697
राज्यात मागील वर्षभरात सर्वाधिक वाहन खरेदी झाली आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 3 लाख 3 हजार 88 वाहनांची खरेदी झाली.
त्याखालोखाल पिंपरी चिंचवडमध्ये 1 लाख 91 हजार 991 वाहने
ठाणे जिल्ह्यात 1 लाख 26 हजार 967 वाहने
नाशिक जिल्ह्यात 1 लाख 19 हजार 838
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 99 हजार 871 वाहनांची खरेदी झाली आहे.