नाशिक : वणी-बोरगाव-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटात बस दरीत कोसळून 7 जण ठार, तर 45 प्रवासी जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान घाटावरील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मध्य प्रदेशातील काही भाविक बसने चारधाम यात्रा करण्यासाठी निघाले होते. यात्रेदरम्यान नाशिकहून देवदर्शन करून गुजरातमध्ये देवदर्शनासाठी जात असताना सापुतारा मार्गावरील माळेगाव घाटातील एका अवघड वळवणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला.