Hospital Organ Donation Campaign 
नाशिक

Hospital Organ Donation Campaign | वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त सनदी अधिकारी पवन शिंदे आणि कुटुंबीयांकडून समाजोपयोगी उपक्रमांची पहल

Hospital Organ Donation Campaign | सायबर सुरक्षा, अवयवदान, साइबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निखिल रोकडे
वर्षश्रद्धाच्या कार्यक्रमाला सामाजिक दायित्वाची जोड देत समाजापुढे नवा आदर्श निर्माण करण्याचा उपक्रम सनदी अधिकारी पवन शिंदे आणि मोटर वाहन व्यावसायिक जीवन शिंदे यांच्या कुटुंबांनी हाती घेतला आहे. त्यांचे वडील कै. वसंतराव देवराम शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त आयोजित वर्षश्रद्धा कार्यक्रमात साइबरविषयक आणि अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दुःखाच्या प्रसंगाला सामाजिकिच्या विचारार्ची जोड देणारा हा उपक्रम नाशिकमध्ये लक्षवेधी ठरत आहे. शुक्रवारी (दि. ३०) हा कार्यक्रम होणार आहे. दिवंगत वडिलांच्या स्मृती जपताना समाजातील ज्वलंत प्रश्नाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

सनदी अधिकारी पवन शिंदे हे २००३ च्या यूपीएससी बॅचचे अधिकारी असून, सुखावातीला त्यांची नियुक्ती पेटंट विभागात माहिती अधिकारी म्हणून झाली आहे. सध्या ते निवडणूक आयोगात कार्यरत आहेत. वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त केवळ पारंपरिक विधींवर न देता सामाजिक प्रश्नांवर जनजगतृती घडवून आणण्याचा शिंदे कुटुंबाचा हा प्रयत्न स्मृतींना समाजोपयोगी विचारांची जोड देणारा ठरत आहे.

'सावध राहा, सुरक्षित राहा' आणि 'अवयवदान करा, जीवनदान द्या' हे दोन संदेश या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. सोशल मीडिया आणि यूपीआयचा वापर वाढला असताना साइबर गुन्ह्यांचे आव्हानही गंभीर बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन साइबर संस्कार संस्थेच्या वतीने साइबर जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

या सत्रात डी. एस. राणा (आयपीएस ऑफिसर) आणि तन्मय दीक्षित मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, सेक्सटॉर्शन, बनावट एपीके फाइल्स, यूपीआय व ओटीपीच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि डिजिटल सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर यावेळी प्रकाश टाकण्यात येणार आहे. नागरिकांनी सावध राहून साइबर गुन्ह्यांना बळी पडू नये, हा या प्रबोधनाचा मुख्य संदेश असेल.

अवयवदानापासून अनेकांना नवजीवन

कार्यक्रमचे दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे अवयवदान जनजागृती. टीम सह्याद्री हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने अवयवदानाचे महत्त्व, त्यासंबंधीची प्रक्रिया, समाजातील गैरसमज आणि नागरिकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. एका व्यक्तीच्या निर्णयामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.

"सध्याच्या डिजिटल युगात अनेक अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष आव्हाने नागरिकांसमोर उभी आहेत. यासाठी जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे, साइबर सुरक्षा ही आजच्या युगात सर्वात महत्त्वाची आहे. तसेच आपल्या नंतरही आपल्या शरीराचा उपयोग इतरांना झालाच पाहिजे, यासाठी अवयवदान चळवळ पुढे नेण्याची आवश्यकता आहे. या उद्देशाने वडिलांच्या वर्षश्रद्धा मध्ये या विषयावर प्रबोधन करण्याचे नियोजन केले आहे."
— पवन शिंदे, सनदी अधिकारी, निवडणूक आयोग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT