नाशिक : उबाठा शिवसेना कार्यालयात बैठकीप्रसंगी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी. Pudhari News Network
नाशिक

BJP Masterstroke Nashik | भाजपच्या 'मास्टरस्ट्रोक 'नंतर महाविकास आघाडीची एकजूट

महापलिकेचे जागावाटप अंतिम टप्प्यात; उबाठा शिवसेना मोठा भाऊ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापलिका निवडणुकीत अर्ज दाखल करण्यास सुरूवात झालेली असताना भाजपने मारलेल्या 'मास्टरस्ट्रोक'नंतर महाविकास आघाडीने अतंर्गत हेवेदावे बाजूला ठेवत एकजुठ दाखवत, एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.२५) तात्काळ महाविकास आघाडीने सम्नवयाची बैठक घेत, जागा वाटप करण्यापेक्षा थेट निवडून येणारा तुल्यबळ उमेदवार हा निकष लावत उमेदवार निश्चिती सुरू केली आहे. रात्री उशीरापर्यंत 22 प्रभागांतील उमेदवारांवर चर्चा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. शुक्रवारी (दि.२६) जागावाटप अंतिम होण्याची शक्यता आहे.

शिवसेना कार्यालयात मविआतील सर्व घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस शिवसेना उबाठाचे नेते माजी आमदार वसंत गिते, सहसंपर्कनेते दत्ता गायकवाड, राहुल दराडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, उल्हास सातभाई, राजेंद्र बागुल, दिनेश बच्छाव, रईस शेख, गौरव सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार आदी उपस्थितीत होते. बैठकीत प्रभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. काही नेते 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असतानाच भाजपला रोखण्यासाठी मविआतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येत ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या प्रभागात कोणाचा प्रभाव अधिक आहे, उमेदवाराची निवडणूक जिंकण्याची क्षमता किती आहे यावर सविस्तर चर्चा झाली. ज्या प्रभागांमध्ये रस्सीखेच आहे ते वगळून इतर जागांवर एकमत होण्याचा प्रयत्न सुरू केला. उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत गुरूवारी रात्रीपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

उबाठा शिवसेना मोठा भाऊ

दरम्यान, बैठकीत प्रभागनिहाय उमेदवारांवर चर्चा झाली. यात, बहुतांश ठिकाणी उबाठा शिवसेनेकडे त़गडे उमेदवार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांना जास्त जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेस तयार

मुंबईत मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेसने सुरुवातीला विरोध दर्शवला.मात्र नाशिकमधील भाजपच्या 'मास्टरस्ट्रोक'नंतर परिस्थिती बदलली असून आता नाशिकमध्ये मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस तयार झाली आहे. याबाबत, शहराध्यक्ष छाजेड यांनी याबाबत वरिष्ठांना कळवणार असल्याचे सांगितले.

मनसेच्या नेत्यांमधे 'वादंग'

पक्षाच्या जागा वाटपात महत्त्वाची भूमिका निभावणारे नेतेच पक्ष सोडून जात असल्याने कार्यकर्ते उद्विग्न झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात शिवसेनेच्या (उबाठा) शालिमार येथील पक्ष कार्यालयात आयोजित बैठकीत मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे व मनोज घोडके यांच्यात जोरदार वादंग झाले. ऐनवेळी पक्ष सोडून जात असल्याचा आरोप मनोज घोडकेंनी केला. तर सुदाम कोंबडेंनी त्यांना माझी बदनाम का करतो, अशी विचारणा केली. यावरून दोघांमधे 'तू-तू, मै-मै' झाली. अखेर सलिम मामा शेख व जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला.

.........कोट

शहरात सत्ताधारी भाजपला जी धुळधाण केली आहे, त्यांना रोखण्यासाठी सर्व समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. सत्तेच्या जोरावर उमेदवार फोडणार्‍यांना जागा दाखवण्यासाठी ही एकजूट आवश्यक आहे. मनसेलाही आम्ही सोबत घेतले आहे. आमचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात येणार असून सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास आहे.

- आकाश छाजेड (शहराध्यक्ष, काँग्रेस)

महाविकास आघाडीच्या याआधीही बैठका झाल्या आहेत. आता जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. ज्या प्रभागात ज्या पक्षाचा उमेदवार प्रबळ आहे त्यानुसार निर्णय घेतला जाईल. उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन मविआ नाशिकमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे.

- दत्ता गायकवाड (उबाठा शिवसेना नेते)

--------------फोटो : महाविकास आघाडी बैठक नावाने सीटी 1 मध्ये सेव

--------------

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT