नाशिक : शिवसेने(उबाठा)चे माजी उपनेते सुनील बागुल, माजी महानगरप्रमुख मामा ठाकरे यांच्यासह गुलाब भोये हे रविवारी (दि. २७) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जलसंपदा गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी एक वाजता हा प्रवेश सोहळा होत आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये 100 प्लसचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. सुधाकर बडगुजर यांच्यापाठोपाठ आता सुनील बागुल, मामा राजवाडे यांना देखील भाजपने गळाला लावले आहे. एका गुन्ह्यामुळे बागुल, राजवाडे यांचा प्रवेश लांबणीवर पडला होता. परंतु तक्रारकर्त्याने तक्रार मागे घेतल्यानंतर बागुल, राजवाडे यांच्या प्रवेशातील अडचण दूर झाली. बागुल यांच्या परिवारातील अन्य सदस्यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षाचे पदाधिकारी प्रवेश करणार आहेत.