नाशिक

Maratha Reservation : उमराणे येथे साखळी उपोषणाला भाजपचे जिल्हा नेते केदा आहेरांची भेट 

गणेश सोनवणे

देवळा(जि. नाशिक) ; उमराणे येथे सुरु असलेल्या मराठा समाज बांधवांच्या साखळी उपोषणास वाढता प्रतिसाद मिळत असुन विविध स्तरातून मोठा पाठींबा लाभत आहे. राज्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र साखळी तसेच आमरण उपोषण सुरु झाले आहे. उमराणे येथील छत्रपती छत्रपती संभाजी राजे चौकात गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषणास सुरुवात झालेली आहे.  भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी या ठिकाणी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे.

पंचक्रोशीतील तिसगाव, व-हाळे, सांगवी, चिंचवे, कुंभार्डे, गिरणारे, खारीपाडा, दहिवड, निंबोळा, डोंगरगाव, मेशी, येथील समाज बांधव तसेच इतर समाजातील नागरिकांनी उपोषणस्थळी सहभाग नोंदउन साखळी उपोषणात भाग घेतला. जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, शिवसेना नेते देवा वाघ, उद्योजक कैलास देवरे, दिनेश देवरे, सुधील देवरे, किशोर जाधव, बळीराम पवार, भुषण देवरे, बाळासाहेब आहिरे, अविनाश देवरे, नरेंद्र गायकवाड, प्रदीप देवरे, नामदेव देवरे, अरुण देवरे, भाऊसाहेब भिमराव, चिंतामण मगर, राजाराम देवरे, जितु देवरे, बापु देवरे, संदीप शिरसाठ, संजय चव्हाण, संजय पगार, उत्तम देवरे, पंडित देवरे आदी समाज बांधव उपोषणाला बसले आहेत.

साखळी उपोषणाला पाठींबा देण्यासाठी माजी भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर, देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार , दादाजी खैरनार, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, माजी सरपंच सुभाष देवरे, मातंग समाज संघटनेचे कैलास शिरसाठ, अनिल पाटील, संजय माउली, उपसरपंच नंदेश थोरात, आदींनी उपोषण स्थळी हजेरी लावून त्यांनी सकल मराठा आरक्षणास पाठींबा दर्शवला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT