विधानसभेसाठी भाजपाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली Pudhari News network
नाशिक

मोठी बातमी! यादी जाहीर; भाजपाकडून नाशिक पश्चिममधून हिरे यांना पुन्हा तिकीट

नाशिक पश्चिममधून हिरे यांना पुन्हा तिकीट

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजला असून त्यानंतर भाजपाची पहिली उमेदवारी यादी आज रविवार (दि.20) रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपाने 99 उमेदवारांची नावे जाहीर केली असून नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे तर नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, चांदवड राहुल आहेर आणि बागलाणमधून दिलीप बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. धुळे शहरमधून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर शिरपूरमधून काशीराम पावरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

अमोल जावळे यांना रावेर, संजय सावकारे यांना भुसावळ, सुरशे भोळे यांना जळगाव, मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा चाळीसगावातून तिकीट मिळाले आहे, गिरीश महाजन यांना जामनेर मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT