Former Shiv Sena and NCP Leaders Join BJP Party
नाशिक : आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपात अनेकांचा प्रवेशोत्सव सुरु झाला असून मंगळवारी (दि. 17) पक्षात मेगा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
भाजपा पक्षातील मेगा प्रवेशामध्ये उबाठा गटातून हाकलपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर तसेच माजी सभापती गणेश गीते यांची घरवापसी होणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय माजीमंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप यांसह शिंदे शिवसेना, काॅंग्रेस पक्षातील अनेक माजी नगरसेवकांचा प्रवेश होऊ शकतो असे सांगितले जात आहे. यात, कोणाला प्रवेश दिला जातो याकडे लक्ष लागले आहे.
विधानसलभा निवडणुकीत महायुतीला यातही भाजपला कौल मिळाला. त्यामुळे भाजपात इनकमिंग वाढले. त्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केल्याने पक्षांतराला वेग आला आहे. बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. मात्र त्यांच्या प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांसह स्थानिक पदाधिका-यांनी विरोध केला. तसेच नाशिक पूर्व मधील पक्षाच्या पदाधिका-यांनाही देखील शहराध्यक्ष सुनील केदार यांची भेट घेऊन गीते यांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला होता. या विरोधानंतर त्यांचे प्रवेश थांबविले गेले होते. परंतू उघड भुमिका घेणा-या आमदारांसह माजी नगरसेवक व पदाधिका-यांची कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी समजूत काढली. यानंतर, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोधा मावळला आहे. त्यामुळे मंगळवारी बडगुजर, गीते यांसह कॉंग्रेस व शिवसेनेच्या उबाठा गटातून भाजपमध्ये प्रवेश करणायांची संख्या अधिक असल्याचे बोलले जात आहे.
पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा व कोणाला नाही याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ घेतील. प्रवेश कोणाला दिला जाईल याबाबत नावे स्पष्ट नाही. येत्या आठवडा भरात प्रवेश होतील.सुनिल केदार (शहराध्यक्ष, भाजप)
आगामी मनपा निवडणूक आणि मेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजपचे नेते निवडणूक महायुतीत लढण्याचे दावे करत असले तरीही भाजपकडून स्वबळाची चाचपणी केली जात आहे. कुंभमेळा पार्श्वभूमीवर एकहाती सत्ता असावी, महायुतीत जरी असलो तरीही भाजपचा वरचष्मा असावा, यासाठी इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. नाशिकच्या राजकारणात गिरीश महाजन यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या माध्यमातूनच बडगुजर आणि गीते यांचे प्रवेश होणार आहेत.
नाशिक – सुधाकर बडगुजर यांच्यासोबत आज 15 ते 20 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नाशिकमधील भाजप प्रवेशाची यादी अशी आहे -
सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर नयना घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी नगरसेवक दिलीप दातीर, अशोक सातभाई हे मंगळवार (दि.17) रोजी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.