सुरगाणा प्रतिनिधी : निसर्गाचा अनमोल ठेवा असलेला सुरगाणा तालुक्यातील सुप्रसिद्ध, नयनरम्य असा "भिवतास धबधबा" महाराष्ट्र व गुजरात राज्यातील पर्यटक व निसर्ग प्रेमींचा नंबर १ सेल्फी पॉईंट बनला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने भिवतास धबधबा व परिसर दिवसेंदिवस गर्दीने फुलत आहे. या ठिकाणी परिसरातून नाशिक जिल्ह्यातून तसेच गुजरात राज्यातून पर्यटक आपल्या संपूर्ण परिवारसह दुचाकी, चारचाकी वाहनाने या ठिकाणी येऊन अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसराचा व धबधब्याचा आनंद लुटून धबधब्या सोबत आवर्जून सेल्फी घेत आहेत.
पर्यटक व निसर्ग प्रेमीं सोबत अनेक लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी या ठिकाणी भेटी देऊन धबधबा परिसराची पाहणी करण्यासाठी येत आहेत. विशेष करून शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी या परिसरात खुप मोठया प्रमाणात गर्दी असते. या परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले दिसून येते. धबधबा परिसरात निसर्ग प्रेमीआनंदाने संचार करत सेल्फी घेतांना दिसून येतात.
"भिवतास धबधबा व परिसराचा लवकरात लवकर पर्यटन स्थळ मंजूर करून विकास करावा, म्हणजे परिसरातील नागरिकांना रोजगार निर्मिती होईल तसेच परिसरातील पाणी अडवून बंधारे बांधल्यास शेती सुजलाम सुफलाम होऊन परिसराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटेल व धबधब्याचे सौंदर्य बाराही महिने अबाधित राहील.नामदेव पाडवी, ठाणगांव