Black Magic Fraud Pudhari File Photo
नाशिक

Black Magic Case | अंधश्रद्धा, बुवाबाजीविरोधात वैज्ञानिक विचारांचा निर्धार

Black Magic Case | नाशिकमध्ये 'भंडाफोड परिषदे'त झाले बुवाबाजीवर मंथन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'आयटक' नाशिक जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने आयोजित 'भंडाफोड परिषद' औरंगाबादकर सभागृह नाशिक येथे पार पडली. 'चला चमत्काराची पोलखोल करूया... विज्ञानाच्या नजरेतून !' या घोषवाक्याखाली झालेल्या या परिषदेमध्ये अंधश्रद्धा, बुवाबाजी, खोटे चमत्कार आणि सर्वसामान्य जनतेची होत असलेली आर्थिक, मानसिक व सामाजिक फसवणूक यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच अंधश्रद्धा, बुवाबाजीविरोधात वैज्ञानिक विचारांचा निर्धार करण्यात आला. कॉम्रेड प्राजक्ता कापडणे यांनी प्रास्ताविक केले.

या परिषदेत डॉ. ठकसेन गोराणे आणि महेंद्र दातरंगे यांनी तथाकथित चमत्कारांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांमध्ये | बुवाबाजीचा भंडाफोड केला. त्यात हातातून आग काढणे, वस्तू हलवणे, अंगात देव येणे किंवा भूतबाधा असल्याचे भास निर्माण करणे अशा अनेक प्रकारांचे त्यांनी प्रत्यक्ष उलगडून दाखवले. अॅड. सुशीलकुमार इंदवे यांनी अंधश्रद्धा व बुवाबाजीविरोधातील जादू‌टोणाविरोधी कायद्याच्या तरतुदी, तसेच फसवणूक, मानसिक व शारीरिक अत्याचार यांसारख्या गुन्ह्यांवर कायदेशीर कारवाई कशी करता येते, याबाबत माहिती दिली.

परिषदेच्या अध्यक्षा कॉ. मीना आढाव यांनी सांगितले की गरीब, कामगार आणि महिला अडचणीच्या काळात बुवाबाजीच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांची फसवणूक होते. चमत्कार काही नसतो, सगळं विज्ञान आहे. घाबरू नका, प्रश्न विचारा आणि योग्य ठिकाणी जा, असे आवाहन केले. यावेळी 'आयटक'चे राज्यसचिव कॉम्रेड राजू देसले, जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड व्ही. डी. धनवटे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक जिल्हा सचिव कॉम्रेड मनोहर पगारे, शहर सचिव कॉम्रेड तल्हा शेख, कांचन पवार, फराह शेख उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT