नाशिक : महाराष्ट्र शिक्षक परिषदेतर्फे 10 नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार असून उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर हॉल तिकीट पाठविण्यात आले आहेत. उमेदवारांनी ते डाऊनलोड करून परिक्षेला येताना प्रिंट सोबत ठेवणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली.
टीईटी परीक्षेसाठी तयारी सुरु असून प्रत्येक परिक्षारुममध्ये कॅमेरे बसविण्याचे काम सुरु आहे. याचे नियंत्रण राज्य शिक्षक परिषदेकडे असणार आहे.
परिक्षा केंद्रांवर थम्ब रिकगनेशन आणि फेस रिडींग करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी सुमारे दीड तास परिक्षा केंद्रांवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
परीक्षा केंद्रात 10 वाजून 10 मिनीटांनी हजर राहणे आवश्यक आहे.
10 सकाळी साडेदहा ते दुपारी 1 पर्यंत पहिला पेपर तर दुपारी अडीच ते 5 दरम्यान दुसरा पेपर आहे.
परिक्षेसाठी 55 केंद्रांवर 21 हजार 87 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
पेपर क्र. 1 साठी 21 केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून 8664 उमेदवार परीक्षेला पात्र ठरले आहेत.
पेपर क्र. 2 साठी 34 केंद्र असून 12,423 उमेदवार परिक्षार्थी असणार आहेत.
एकूण 55 केंद्रांवर 21 हजार 87 परीक्षार्थी आहेत.
प्राथमिक शिक्षकांसाठी (इयत्ता पहिली ते पाचवी) साठी पेपर क्र. 1
उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी (इयत्ता सहावी ते आठवी) साठी पेपर क्र. 2 घेतला जातो.
किमान 50 टक्के गुणांसह शिक्षणशास्त्रातील डिप्लोमा किंवा बी.एड पात्रताधारक उमेदवार परिक्षेस पात्र ठरले आहेत.
परीक्षेस एकूण 8 झोनची निर्मिती करण्यात आली असून 8 झोनल अधिकारी आणि 59 सहाय्यक परिरक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
10 नोव्हेंबर रोजी परीक्षा; केंद्रांच्या 100 मीटर जवळपास परिसरात सभेचे आयोजन करू नये
9 आणि 10 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक प्रशिक्षण वर्गाचे देखील आयोजन करू नये
परीक्षेच्या कामकाजासाठी तेराशे अधिकारी कर्मचार्यांची नियुक्ती