नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलदाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी करणारी जनहित याचिका (पीआयएल) मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून औरंगजेबच्या कबरीला "राष्ट्रीय महत्त्व" नाही असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार कबरीला दिलेला राष्ट्रीय विशेष दर्जा काढून टाकण्याची मागणी याचकेत करण्यात आली आहे. औरंगजेब हा मूळ भारतीय नसल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे.