नाशिक

नाशिकमध्ये डॉक्टरवर कोयत्याने हल्ला; प्रकृती चिंताजनक

दिनेश चोरगे

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर हॉस्पिटलमध्ये आज्ञाताने धारदार कोयत्याने हल्ला केला. अज्ञात हल्लेखोराच्या हल्ल्यात डॉ. राठी गंभीररित्या जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २३) रात्री नऊच्या सुमारास घडली. त्यांना पुढील उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून याप्रकरणी पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे.

दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ डॉ. राठी यांचे सुयोग हॉस्पिटल आहे. शुक्रवारी रात्री संशयित आरोपी त्यांना भेटायला आला. त्यानंतर त्याने डॉ. राठी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा सुरू केली. चर्चेदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्यांनतर संशयित आरोपीने डॉ. राठी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. संशयिताने डॉ. राठी यांच्या डोक्यावर व मानेवर त्याने १५ ते २० वार केले. व तेथून पळ काढला. याची माहिती मिळताच हॉस्पिटलमधील कर्मचारी धावत आले. व त्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव , पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड , यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. संशयिताने राठी यांच्यावर हल्ला का केला? याचे कारण समजू शकले नाही.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT