नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क् – गंगापूर रोडवरील सोसायटी तळमजल्यावरील मोगली कॅफेवर अचानक छापा कॅफे सुरु करून तेथे जोडप्यांना आडोसा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेचालकांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही जामीन दिलेला आहे. त्यानंतर मोगली कॅफे छापा प्रकरणात मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले असल्याची तक्रार विद्यार्थी संघटनेने केली आहे. (Nashik A' Mowgli's Cafe )
मात्र परवानगीशिवाय संबंधितांचे छायाचित्र व चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या. त्यामुळे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले असून, संबंधित आमदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या (aisfnashik एआयएसएफ) नाशिक शाखेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. (Violation of fundamental rights)