Land Acquisition, Nashik file photo
नाशिक

Ashok Kharat Land Scam | भोंदू खरातचा सावकारी पाश! शिर्डीतील तिघांच्या आत्महत्येचे गूढ पुन्हा चर्चेत; लॉन्ससाठी रचला होता सापळा

Ashok Kharat Land Scam | शिर्डीतील एक कुटुंब केले उद्ध्वस्त; प्रकरणही दडपले

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खरातने सावकारीतूनही कोट्यवधींची माया तंत्र मंत्रातून कुकृत्य करणाऱ्या अशोक जमवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरातच्या या सावकारी पाशातून शिर्डीतील तिघांनी आत्महत्या केल्याची चर्चाही पुन्हा एकदा रंगत असून, खरातने हे प्रकरण हातोहात कसे दडपले, हेदेखील नव्याने चर्चिले जात आहे.

खरातने कोट्यवधी रुपयांची माया जमवताना, अनेकांनी फसवणूक केली. कित्येक शेतकऱ्यांच्या कवडीमोल भावात जमिनी लाटल्या. अनेकांना तंत्र-मंत्राची भीती दाखवत त्यांच्या मालमत्ता बळकावल्या. खरात एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सावकारीतूनही मोठी माया गोळा केली होती.

शिर्डीतील आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबाला त्याने सावकारी कर्जातून मोठी रक्कम दिली होती. या कुटुंबाकडे लग्न सोहळ्यासाठीचा लॉन्स होता. खरातचा या लॉन्सवर डोळा होता. त्यातूनच त्याने अधिक व्याजदराने या कुटुंबीयांना कर्ज दिले होते. कालांतराने या कुटुंबाने कर्जही फेडले होते. मात्र, अशातही खरातकडून त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला जात होता. त्या कुटुंबाला धमकावले जात होते.

नेते, मंत्री, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ओळखीचे दाखले दिले जात होते. अखेर त्या कुटुंबीयांनी शिर्डीतील हा लॉन्स खरातच्या नावे करून देत स्वतःची सुटका करून घेतली. मात्र, तोपर्यंत या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली होती. तसेच आणखी एकाने खरातच्या सावकारी कर्जातून आत्महत्या केली होती. त्यावेळी खरातने आत्महत्यांचे हे तिन्ही प्रकरणे हातोहात दडपली होती. दरम्यान, खरातचे कारनामे समोर येऊ लागल्याने, या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा रंगत आहे.

शिर्डीवर विशेष डोळा खरातचा

शिर्डीवर विशेष डोळा होता. याठिकाणी मालमत्ता घेण्यासाठी तो नेहमीच तयार असायला. त्याने शिर्डीच्या पानमळ्यात ३० गुठ्यांची कोट्यावधी रुपयांची किंमत असलेली मालमत्ता घेतली आहे. याशिवाय शिर्डी भागातच त्याने ७० कोटींच्या जमिनी आणि प्लॉट घेतले आहेत. शिर्डीत त्याचा सावकारीचा व्यवसाय सुसाट होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT