मेंढपाळाच्या प्रतिहल्ल्यात ‌‘त्या‌’ कोल्ह्याचा मृत्यू 
नाशिक

Ashok Kharat Nashik | विकृतीचा कळस! कोल्ह्याच्या कानाचे मांस अन् वाघाची कातडी; भोंदू खरातच्या 'रक्तपाता'चा थरार उघड

Ashok Kharat Nashik | भोंदू अशोक खरात प्रकरणात समोर येणाऱ्या धक्कादायक माहितीतून एक वेगळी बाजूही पुढे येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणात समोर येणाऱ्या धक्कादायक माहितीतून एक वेगळी बाजूही पुढे येत आहे. खरातकडे येणाऱ्या सर्वच महिलांचे लैंगिक शोषण झाले असे नसून, काही महिलांनी त्याच्या अश्लील वर्तनाला ठाम विरोध केला होता.

मात्र, सामाजिक प्रतिष्ठा आणि बदनामीच्या भीतीमुळे अशा अनेक घटना पोलिसांपर्यंत पोहोचल्याच नाहीत, हे वास्तव समोर येत आहे. सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेत, एक उच्चशिक्षित युवती करिअर मार्गदर्शनासाठी आपल्या पालकांसमवेत खरातकडे आली होती.

तिचा बायोडाटा आणि मोबाइल क्रमांक घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याने रात्री उशिरा फोन करून अश्लील संभाषण सुरू केले. 'मग माझ्याजवळ कधी झोपणार?' असा प्रश्न विचारताच युवती संतप्त झाली आणि तिने त्याला सुनावले. यानंतर पालकांनी त्याच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला, मात्र पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही.

अशा प्रकारच्या घटना अनेक असल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे. वन्यजीवांवरही अत्याचार भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाचा वेग वाढत असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

महिलांच्या शोषणासोबतच खरातने वन्यजीवांच्या जीवाशीही खेळ केल्याचे तपासातून उघड झाले आहे. अंधश्रद्धेचा आधार घेत त्याने भक्तांची दिशाभूल करत वन्यजीवांशी संबंधित बनावट व बेकायदेशीर वस्तूंचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे.

तपासानुसार, कोल्ह्याला शिंगे नसतानाही कोल्ह्याची शिंगे असल्याचा भास निर्माण करून तो कोल्ह्याच्या कानाचे मांस पूजेसाठी देत असे. तसेच वाघाच्या कातडीचाही वापर केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकारामुळे वन्यजीव संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि संबंधित यंत्रणा सक्रिय झाल्या असून, खरातविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT