Ashok Kharat Nashik Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case Nashik| हळदी समारंभात शर्ट न काढण्याचा प्रकार

भोंदू खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : येथील भोंदू अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. आता त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या माहेरच्या पाडळी गावातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथकाने तालुक्यातील पाडळी येथे जात चौकशी केली असता ग्रामस्थांनी अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आणि कल्पना यांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला होता. मात्र, विवाहापूर्वी हळदी समारंभात अशोक खरातने शर्ट काढण्यास नकार दिल्याचा अजब प्रकार घडला होता. त्याचे हे वर्तन तेव्हा गावकऱ्यांना संशयास्पद वाटले होते. गावात तो क्वचितच येत असे. त्याचे वागणे नेहमीच गूढ स्वरूपाचे असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. याशिवाय, २०११ मध्ये कल्पना खरातच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अशोक खरात अंत्यविधीला उपस्थित होता. त्यावेळी त्याने कोणतेही संशयास्पद वर्तन केले नसल्याने त्याच्या भोंदूगिरीचा अंदाज कुणालाही आला नव्हता, असेही ग्रामस्थांनी नमूद केले.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे कल्पना खरात गेल्या १६ वर्षांपासून आपल्या माहेरी गेलेली नसल्याचे समोर आले. वडील आणि भावाच्या निधनासारख्या प्रसंगीही तिने माहेरी न जाता सर्व संबंध तोडल्याचे सांगण्यात आले. तिच्या माहेरच्या शिंदे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून ते शेतीवर उदरनिर्वाह करत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी अशोक खरातने सामान्य नागरिकांची फसवणूक करत जमा केलेली संपत्ती शासनाने जप्त करावी, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT