Ashok Kharat Nashik Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Nashik Case | भोंदू खरातची कोर्टात पाच वाक्ये; म्हणाला, 'अशी मला साप, वाघ याबाबत माहिती नाही'

Ashok Kharat Nashik Case | पाच दिवसांनी पोलिस कोठडी वाढविली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या महिलांवरील अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला भोंदू अशोक खरात यास मंगळवारी (दि. २४) नाशिक सत्र न्यायालयात हजर केले असता २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना खरातकडून पाच नरबळी दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

न्यायाधीश आर. एच. पाटील यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून पोलिस कोठडी सुनावली. घेतल्यानंतर खरातला पाच दिवसांची व न्यायालयीन सुनावणीदरम्यान खरातचे वर्तन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. संपूर्ण युक्तिवाद सुरू असताना तो मान खाली घालून उभा राहिला होता आणि स्वतःच्या हाताच्या बोटांकडे एकटक पाहत असल्याचे दिसून आले.

न्यायालयाने 'काय हो, काही बोलायचे आहे का?' असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने केवळ पाच वाक्यांत उत्तर दिले. दुपारी सुमारे ३.५० वाजता कडक पोलिस बंदोबस्तात, तोंडावर काळा कपडा बांधून खरातला न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयात आधीच वकील प्रशिक्षणार्थीची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे २०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता.

पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी, विश्वास पाटील, प्रवीण चव्हाण आदी पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, ६७ वर्षीय खरात ३० वर्षांच्या महिलांशी संपर्क साधून त्यांचे शोषण करत होता. त्याच्या फार्महाउसमधून शस्त्रसाठा आणि इतर संशयास्पद वस्तू सापडल्याने तपासाची व्याप्ती मोठी आहे.

मंदिर संदर्भातील तपासात वाघ, साप आणि कस्तुरीसंबंधीही संशय व्यक्त करत वन कायद्यांतर्गत गुन्ह्याची शक्यता वर्तवण्यात आली. बचाव पक्षाचे वकील संजय भाटे यांनी पोलिसांच्या • मागणीला विरोध करताना सांगितले की, तपासाला सात दिवस झाले आहेत. डीव्हीआर, लॅपटॉप, पैसे आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मात्र, पेन ड्राइव्हचा उल्लेख कुठेच नाही.

मालमतेसंदर्भात सर्व माहिती नोंदणी कार्यालयात मिळेल, त्यामुळे पुढील पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. या प्रकरणात अत्याचार, फसवणूक, शस्त्रसाठा, वन्यजीव संबंधित गुन्हे आणि नरबळीचा संशय अशा अनेक अंगांनी तपास सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

कोर्टात खरातची पाच वाक्ये

  • अशी मला साप, वाघ याबाबत माहिती नाही.

  • मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे.

  • मंदिरात कधीतरी जायचो, तेव्हा १०० च्या आसपास लोक असायचे.

  • शिवरात्र, श्रावणी सोमवारी जात होतो.

  • कोठडीत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT