sonography machine 
नाशिक

Ashok Kharat Case | नाशिक हादरले! खरात प्रकरणात आता सोनोग्राफी सेंटर रडारवर; गर्भपाताचा धक्कादायक आरोप

Ashok Kharat Case | खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष तपास पथकाच्या रडारवर आता न शहरातील एक सोनोग्राफी सेंटर आले असून, त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष तपास पथकाच्या रडारवर आता न शहरातील एक सोनोग्राफी सेंटर आले असून, त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पीडितेला गर्भवती करून तिचा गर्भपात केल्याच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून, तपासाच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

दाखल गुन्ह्यांपैकी दुसऱ्या प्रकरणाचा तपास करत असताना संबंधित सोनोग्राफी सेंटरचा संदर्भ समोर आल्याने पोलिसांनी तत्काळ संबंधित ठिकाणी भेट देत कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये रुग्ण नोंदवही, वैद्यकीय अहवाल, तसेच सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पीडितेचा कोणत्या परिस्थितीत आणि कुठे गर्भपात करण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी चौकशी केली जात आहे. संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणातून आणखी काही महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT