नाशिक

Ashok Kharat Case : खरातच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यांमधून, 17 कोटींचे व्यवहार झाल्याचे उघड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भोंदूगिरी व फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांचे शोषण, अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार अशा विविध आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातने अनेक व्यावसायिक व सामान्य नागरिकांनाही गंडविल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणात राष्ट्रीयीकृत बँक खात्यांद्वारे मोठ्या आर्थिक व्यवहारांचा धागा समोर आल्याने प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे. 17 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, अशोक खरातने विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली होती. यात शिर्डी परिसरातील सुमारे 11 ते 12 एकर जमिनीचा समावेश असल्याची माहिती आधीच समोर आली होती. त्यापैकी अलीकडेच खरेदी करण्यात आलेल्या सुमारे 4 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी राष्ट्रीयीकृत बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही खाती कल्पना खरातच्या नावावर असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या खात्यांमधून 17 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. या व्यवहारांमागील स्रोत, निधीचा प्रवाह आणि संबंधित व्यक्तींचा सहभाग, याचा तपास सुरू आहे. पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT