नाशिक, मालेगावला स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापनेस मान्यता 
नाशिक

नाशिक, मालेगावला स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापनेस मान्यता

गणेश सोनवणे

नाशिक : नाशिक व मालेगाव शहरातील वाढते नागरीकरण, लोकसंख्येत झालेली वाढ आणि कामाच्या वाढत्या व्यापामुळे प्रशासकीय यंत्रणेवर अधिक भार आहे. त्यामुळे लोकाभिमुख प्रशासन व कामकाजात गतिमानता आणण्यासाठी शासनाने नाशिक व मालेगाव तालुक्यांमध्ये स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापनेस मान्यता दिली आहे.

नाशिक व मालेगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सन २०११ च्या तुलनेत लाेकसंख्येत साधारणत: दुपट्टीने वाढ झाली आहे. वाढती लाेकसंख्या व नागरीकरणामुळे प्रशासकीय पातळीवर कामाचा ताणही वाढीस लागला आहे. नाशिक व मालेगाव तहसिल कार्यालयात दररोज शेकडोने जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या दृष्टीने नोंदी, जमिनीशी निगडीत दावे-हरकती, न्यायालयीन केसेस, विविध प्रकारचे दाखले वितरण व परवानग्या अशी प्रकरणे येत असतात. मात्र, तहसील कार्यालयांमधील अपुरे मनुष्यबळ त्यातच 'व्हीव्हीआयपीं'च्या दौऱ्यामुळे अधिकारी व कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. तहसिल कार्यालयांवरील कामाची विभागणी करण्यासाठी अपर तहसिलदार पदनिर्मिती करावी, असा प्रस्ताव तत्कालिन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी राज्य शासनाला सादर केला होता. त्यानुसार या ठिकाणी अपर तहसिलदार पद निर्मितीस मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये अपर तहसीलदारासोबतच नायब तहसिलदार,अव्वल कारकून आणि महसूल सहायक (लिपिक-टंकलेखक) अशी चार पदे या कार्यालयांसाठी मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्यांची कामे तातडीने मार्गी लागणार आहेत.

नाशिक तहसीलदार (एकूण मंडळे ५ व महसुली गावे ७५)

मंडळ : माडसांगवी, शिंदे, गिरणारे, भगूर, महिरावणी.

---

नाशिक अपर तहसिलदार (एकूण मंडळे ५ व महसुली गावे ३३)

मंडळ : नाशिक, सातपूर, देवळाली, मखमलाबाद, पाथर्डी.

---

मालेगाव तहसिलदार (एकुण मंडळे १२ व महसुली गावे १४१)

मंडळ : दाभाडी, अंजग, सौंदाणे, कोळाणे नि, जळगाव निं., निमगाव, कळवाडी, झोडगे, करंजगव्हाण, डोंगराळे, वडनेर, सोयने खुर्द.

---

मालेगाव अपर तहसीलदार (एकुण मंडळे ३ व महसुली गावे १०)

मंडळ : मालेगाव, करंजगव्हाण, सायने

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT