Vishnudas Bhave Portrait 
नाशिक

Vishnudas Bhave Portrait | मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या कालिदास कलामंदिर येथील प्रतिमा अनावरणाला आज एक वर्ष पूर्ण

Vishnudas Bhave Portrait | 'कालिवास'मध्ये प्रतिमा अनावरणाला आज एक वर्ष पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या कालिदास रंगमंदिरात प्रतिमा अनावरण सोहळ्याला यंदाच्या रंगभूमिदिनी गुरुवारी (दि. ५) एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. गेल्या वर्षी रंगभूमिदिनाचे औचित्य साधून, अभिनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते या प्रतिमेचे दिमाखात अनावरण झाले होते.

नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या दर्शनी भागात मराठीतील अनेक प्रसिद्ध नाटककारांच्या प्रतिमांचे देखणे दालन उभारले आहे. मात्र, या दालनात मराठी रंगभूमीची पायाभरणी करणाऱ्या विष्णुदास भावे यांचीच प्रतिमा नसल्याची बाब रंगकर्मी भालचंद्र कुंटे या नाट्यप्रेमीने नाशिकमध्ये दाखल झाल्यावर प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

हा ऐतिहासिक कमतरता दूर करण्यासाठी कुंटे यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि नाट्यपरिषद नाशिक शाखा अध्यक्ष रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या सकारात्मक प्रयत्नांना यश येऊन गेल्या वर्षी रंगभूमिदिनी अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते भावे यांच्या प्रतिमेचे अनावरण केले होते. या घटनेला आज एक वर्ष होत असून, जागरूक नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे नाशिकच्या नाट्यगृहात 'रंगभूमीच्या जनकाला' त्याचे हक्काचे स्थान मिळाले, अशा भावना या निमित्ताने व्यक्त होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT