नाशिक : असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात 'असोचेम'च्या (ASSOCHAM) वतीने शारजाह (युएई) सरकारच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिकमधील उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा जागतिक पातळीवर विस्तार करण्यासाठी 'बी २ बी' बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
युरोप, आफ्रिका आणि मध्य आशियामध्ये भारतीय उदयोगांनी विस्तार करायला हवा. नाशिकमधील उद्योगांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शारजाह (युएई) सरकार तर्फे देण्यात येत आहे. येथील उद्योजकांना याबाबत माहिती व्हावी हा या बैठकीमागील उद्देश आहे. हा कार्यक्रम निशुल्क असून पूर्व नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी, 91-9920186337 या मोबाईल नंबर वर किंवा anita.naik@assocham.com.या ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर बैठक ९ आणि १० जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत द गेटवे हॉटेल अंबड, नाशिक येथे होत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍग्रीकल्चर अँड इंडस्ट्रीज नाशिक (MACCIA), अंबड इंडस्ट्रियल मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) आणि स्त्री उद्यमी फाउंडेशन, इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग आणि एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स या संस्था सदर उपक्रमात सहभागी आहेत. भारतीय विशेषतः नाशिकमधील व्यवसायांना युएई मधील संधींसह व्यापक क्षेत्राशी जोडणे हा यामागील उद्देश आहे. असोचेमचे महाराष्ट्र राज्य विकास समिती अध्यक्ष आणि एटीसी लॉजिस्टिकचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू भडकमकर यांनी सांगितले की, युएई हे भारतीय व्यवसायांसाठी एक पसंतीचा पर्याय म्हणून उदयास आले आहे. युरोप, आफ्रिका आणि मध्य आशियामध्ये भारतीय उदयोगांनी विस्तार करायला हवा. नाशिकमधील उद्योगांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य यूएई सरकार तर्फे देण्यात येत आहे. येथील उद्योजकांना याबाबत माहिती व्हावी हा या बैठकीमागील उद्देश आहे.