नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि मधुश्री पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ५) प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि 'ऐवज'चे लेखक अमोल पालेकर यांची तसेच 'क्युरेटर' संध्या गोखले यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. वृंदा भार्गवे या दोन्ही मान्यवरांची मुलाखत घेणार आहेत. कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने करण्यात आले आहे.