नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी जमिनीत सोडले जात असल्याने भूजल प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. १६) घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह आयमा, निमा आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेतल्यानंतर त्यांनी प्रदूषणकारी उद्योगांवर कठोर कारवाईचे संकेत दिले. तसेच आतापर्यंत ५० हून अधिक कंपन्या सील करण्यात आल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.
अंबड परिसरातील औद्योगिक सांडपाणी जमिनीत मुरत असल्याने भूजल दूषित होण्याबरोबरच स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत औद्योगिक संघटना, आरोग्य विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. बाहेरून आलेल्या तज्ज्ञांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
नागरिकांमध्ये कर्करोगासह गंभीर आजारांची भीती निर्माण झाली असताना, तज्ज्ञांनी त्वचेच्या कर्करोगाबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितल्याची माहिती महाजन यांनी दिली. तसेच प्रदूषणाच्या बाबतीत एक- दोन टक्क्यांचीही चूक आढळली, तरी संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच औद्योगिक सांडपाण्याची योग्य प्रक्रिया न करता त्याची विल्हेवाट लावली जात असल्यास, संबंधित कंपन्यांना जबाबदार धरले जाईल. बेकायदेशीर उद्योगांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असून, कंपन्यांतील पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचे काम महिनाभरात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाची चौकशी
अंबडमधील प्रदूषणाच्या प्रश्नाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असल्यामुळे या प्रकरणी आपण उद्योगमंत्री तसेच मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. संबंधितांवर कारवाई करण्याबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल. यापूर्वीही अधिकाऱ्यांना सक्त शब्दांत सुनाविण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले.
'मुबलक पाणीपुरवठा, बोअरवेलमधून पाणी घेणाऱ्यांवर कारवाई' दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काही बोअरवेल सील करण्यात आले आहेत. सील केलेल्या बोअरवेलमधून बेकायदेशीरपणे पाणी घेण्याचा प्रय करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत नाही. आवश्यकतेनुसार मुबलक शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जात अस काही सोसायट्यांना पाणीपुरवठ्याची जोडणी करून देण्यात आली आहे, अर पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.
'अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे' मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयीन निकालावर प्रतिक्रिया देताना महाजन यांनी, अत्याचार करणाऱ्या कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा गंभीर गुन्ह्यांमा जलदगतीने न्याय मिळणे आवश्यक असून, सहा महिन्यांच्या आत निक लागण्याची व्यवस्था असावी. त्यामुळे कायद्याचा धाक राहण्यास मदत हो असे मतही त्यांनी व्यक्त केले.