Alphonso Mango Pudhari
नाशिक

Alphonso Mango Export | हापूसची न्यू यॉर्कला भरारी! लासलगाव केंद्रातून 4 टन आंबा अमेरिकेला रवाना

Alphonso Mango Export | लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात कृषक विकिरण केंद्रातून यंदा प्रथमच चवदार हापूस आंब्याची थेट अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे निर्यात करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : राकेश बोरा

लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात कृषक विकिरण केंद्रातून यंदा प्रथमच चवदार हापूस आंब्याची थेट अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे निर्यात करण्यात आली. मंगळवारी (दि. ७) १,१०० बॉक्समधून ४ टन हापूस व केशर आंबा विकिरण प्रक्रिया पूर्ण करत रवाना करण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली.

अमेरिकेच्या मान्यतेसाठी आवश्यक तपासणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. अमेरिकेकडून आलेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लासलगाव येथील केंद्राची पाहणी करत आंबा निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र दिल्यानंतर ही निर्यात शक्य झाली.

त्यामुळे यंदाच्या हंगामाल सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळाला आहे. या केंद्रात २००२ ते २००६ दरम्यान केवळ कांद्याचे विकिरण केले जात होते. २००७ पासून आंब्यावरही प्रक्रिया सुरू झाली

सुरुवातीला पणन मंडळाकडे असलेला प्रकल्प नंतर खासर्ग कंपन्यांकडे गेला. सध्या हिंदुस्थान अँग्रो लिमिटेड ही कंपनी ह प्रकल्प चालवत आहे. मागील वर्षी आवश्यक प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने आंबा निर्यात होऊ शकली नव्हती.

यंद कोकणातील हापूस आणि गुजरातमधील केशर आंब लासलगावी आणत त्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली या प्रक्रियेमुळे आंबा अधिक काळ टिकतो. कोयीतील कीड नह होत चव व ताजेपणा अबाधित राहतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT