नाशिक : पुढारी ऑनलाइन न्यूज | भगूर नगर परिषदेतर्फे नगरोत्थान अभियानांतर्गत भगूर शहरासाठी 24.68 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. मात्र त्यानंतर काही कार्यक्रमामध्ये पवार यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त हाती आले आहेत.
अजित पवारांची यांची प्रकृती अचानक बिघडली असल्याने त्यांनी आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते ओझरवरुन थेट पुण्याकडे रवाना झाले आहेत.