एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विधानसभेसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. FILE PHOTO
नाशिक

AIMIM | ओवीसींकडून मालेगाव व धुळे मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विधानसभेसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात मालेगावमधून विद्यमान आमदार मौलांना मुफ्ती मोहमंद इस्माईल, तर धुळ्यातून फारुख शाह यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उमेदवारांची घोषणा केली. दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडीला सामील होण्यासाठी प्रस्ताव दिला होता. सप्टेंबर मध्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशाराही देण्यात आला होता. उर्वरित उमेदवारांमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील, मुंबईतून रईस लष्करीया, सोलापूरचे फारूक शाब्दी यांच्या नावाची घोषणा केली आहे .इतर विधानसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांची निवड केली हे नंतर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT