Nashik Municipal Election Pudhari News Network
नाशिक

Nashik Zilha Prishad | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रस्तावित नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जोरदार तयारी

Nashik Zilha Prishad | सिंहस्थ ध्वजारोहण तयारी : जिल्हाधिकाऱ्यांकडून २५ ऑक्टोबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यासाठी ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसरातील विकासकामे २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यंत्रणांना दिले आहेत.

तसेच परिसरात सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी आढावा बैठकीत दिल्या. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या कार्यालयात मंगळवारी (दि. २०) झालेल्या आढावा बैठकीला आ. हिरामण खोसकर, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष पल्लवी शिरसाठ, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर अधीक्षक विमला एन., सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अपर आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार गणेश जाधव,

मुख्याधिकारी गोविंद जाधव, अमोल चौधरी आणि पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कुशावर्त परिसरातील कामांचे चार भाग करून स्वतंत्र कृती आराखडे तयार करण्याचे सहकार स्पष्ट केले. कॉंक्रिट, फॅब्रिकेशन, वेल्डिंग, रंगकाम आणि सँडब्लास्टिंगची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

तसेच गरजेनुसार रात्रीच्या वेळेetही कामे सुरू ठेवून आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याची शक्यता घेऊन हेलिपॅड, हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्था, प्रवेशिका वितरण आणि आसनव्यवस्थेचे नियोजन करण्यात येणार आहे.

तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पर्यायी मार्ग निश्चित करणे आणि यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यावरही भर देण्यात आला.
दरम्यान, सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाच्या कारणास्तव ३० व ३१ ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, सर्व विभागांनी समन्वयाने कामे पूर्ण करून प्रलंबित बाबींचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची 'रिअल टाईम' तालीम


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष तयारी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून धर्मध्वज शोभायात्रा, नगरप्रदक्षिणा, ध्वजारोहण आणि गोदा आरती या कार्यक्रमांच्या अनुषंगाने पोलिसांकडून 'रिअल टाईम' रंगीत तालीम आयोजित करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही तालीम घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी बंदोबस्ताचे नियोजन कसे असेल, विविध यंत्रणांत समन्वय कसा साधला जाईल आणि संभाव्य अडचणींवर कोणत्या उपाययोजना करता येतील, याची या माध्यमातून पडताळणी केली जाणार आहे. बुधवारी (दि. २१) दुपारी ४ ते ७ या वेळेत तपोवन ते रामकुंड या मार्गावर धर्मध्वज शोभायात्रा आणि नगरप्रदक्षिणेची रंगीत तालीम होईल. गुरुवारी (दि. २२) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत भाजी बाजार पटांगणावर ध्वजारोहणाचा सराव होईल, त्याच दिवशी दुपारी ४.३० ते ७.३० या वेळेत रामकुंड परिसर गोदा आरतीच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली जाणार आहे.

आपत्कालीन उपाययोजनांची तपासणी

या रंगीत तालमीत प्रवेश व निर्गमन, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची चाचणी घेतली जाईल. सरावादरम्यान बंदोबस्ताच्या आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी पोलिस बंदोबस्त प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे.

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणारे सर्व कार्यक्रम सुरक्षित, सुरळीत आणि शांततेत पार पाडावेत, यासाठी पोलिस प्रशासनाकडून पूर्वतयारीवर भर देण्यात येत आहे. या रंगीत तालमीमुळे आगामी कुंभमेळ्यातील मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या बंदोबस्ताचे नियोजन अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे. २१ ऑक्टोबरच्या सरावादरम्यान शोभायत्रेच्या मार्गावरील पोलिस बंदोबस्ताची आखणी, वाहतूक नियमन, गर्दी नियंत्रण आणि संबंधित यंत्रणांतील समन्वयाची पडताळणी केली जाईल. २२ ऑक्टोबरला ध्वजारोहण आणि गोदा आरती या कार्यक्रमांसाठी स्वतंत्र वेळेत संपूर्ण पोलिस बंदोबस्तासह सराव होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT