नाशिक

लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार : अब्दुल सत्तार

गणेश सोनवणे

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

विविध कारणे देऊन व्यापारी लिलाव बंद ठेवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. त्यामुळे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर  कडक कारवाई करणार असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. सत्तार येवला येथे एका खासगी कार्यक्रमास आले होते.

सध्या राज्यात गणपती आगमनाने सणासुदीचा काळ आहे. या काळात लिलाव बंद ठेवणे अयोग्य आहे. जे व्यापारी लिलाव बंद ठेवतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश आपण पणन आयुक्त व नाशिक जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे यावेळी सत्तार यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT