एमपीएससी मधून फौजदार झालेली श्रद्धा तुपे Pudhari Photo
नाशिक

वैजापूर : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतकऱ्याची कन्या बनली पोलिस अधिकारी

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर : नितीन थोरात

जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यशापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागत नाही. हेच ध्येय उराशी बाळगलेल्यांना परिस्थिती कधीच आडकाटी बनू शकत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे रामवाडी येथील मध्यम कुटुंबातील श्रद्धा तुपेने फौजदार पदापर्यंत मारलेली मजल, श्रद्धा भगवान तुपे मध्यमवर्गीय कुटुंबातील कन्याचे प्राथमिक शिक्षण रामवाडी येथिल जिल्हापरिषदेच्या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण हे स्वामी विवेकानंद विद्यालय गारज येथे पुर्ण झाले तसेच उच्च माध्यमिक शिक्षण कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे घेतले.

लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या श्रद्धाचे उच्च माध्यमिक शिक्षणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करण्याचे ठरवले. घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेक दिवस तिने घरी राहून अभ्यास केला. यानंतर ती पुणे येथे आपल्या मैत्रिणी सोबत शासकीय अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत होती. सन २०२२ मध्ये घेण्यात आलेले फौजदार पदासाठी श्रद्धा ने अर्ज केला होता त्या अनुषंगाने श्रद्धा ची तयार देखील पूर्ण झाली होती. परीक्षा दिल्यानंतर तिचे लक्ष निकाला कडे लागून होतें एक ऑगस्ट रोजी निकाल लागल्यानंतर अंतिम निवड यादीमध्ये तिची अखेर निवड झाली.

या परीक्षेमध्ये तिने राज्यातून सात्यव्या क्रमांकाचे गुण घेवुन पहिल्याच प्रयत्नामध्ये फौजदार पदाचे पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. तिच्या या यशानंतर तिच्या मूळ गावी जल्लोष करण्यात आला. तिने मिळवलेले या यशानंतर डॉ. दिनेश परदेशी, तहसिलदार सुनिल सावंत, डॉ.अमोल अन्नदाते, स्वाध्याय परिवाराचे बाबासाहेब वारकर, प्रकाश तुपे यांनी तिचे अभिनंदन केले.

काय म्हणाली श्रद्धा?

मला मिळालेले यशामध्ये माझ्या आईचा खारीचा वाटा आहे. कारण तिची लहानपणापासून इच्छा होती की, मी मोठी अधिकारी व्हावे. त्यासाठी वडिलांनी देखील मला पाठबळ दिले आहे. माझ्या यशाची शिल्पकार तेच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT