accident
accident file photo
नाशिक

Nashik Accident News | रस्ते अपघातात दिवसाला 42 जणांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : जिजा दवंडे

दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, खराब रस्ते आणि प्रवाशांकडून होणारे वाहतूक नियमांचे उलंघन इत्यादी कारणांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असून गतवर्षी 2023 डिंसेबरपर्यंत राज्यात 35 हजार 243 अपघात होऊन 15 हजार 336 जनांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 29 हजार 764 जण जखमी झाले आहेत. या संख्येचा सरासरी विचार केल्यास राज्यात दिवसाला होणाऱ्या विविध अपघातात 42 जनांचा मृत्यू तर 81 जण गंभीर जखमी होत असल्याचे भीषण वास्तव आहे.

राज्यात रस्ते सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन विभाग, रस्ते महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून विविध जनजागृती उपक्रम राबविले जातात. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड देखील अकारला जातो. असे असले तरी राज्यात दररोज नवीन वाहनांची संख्या वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला खराब रस्ते आणि वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करत सुसाट वाहने चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करणे, मद्य प्रशान करून वाहन चालविणे वाहन सुस्थितीत नसताना चावलविण तसेच वाहन चालविण्याचो परवाना नसणे, सुरक्षेसाठी उपाय योजना न करतान वाहने चालविणे आदी प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करून अपघातला निमंत्रण दिले जाते. यातून दररोज राज्यात कुठे ना कुठे अपघात होऊप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. अपघाताबाबत राज्याच्या परिवहन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये प्रति हजार वाहनामागे अपघाताची संख्या 25 इतकी आहे. ही संख्या 2020 मध्ये 10 इतकी होती. म्हणजेच 3 वर्षांत अपघाताचे प्रमाण दुपट्टीने वाढले आहे.

अपघातांची संख्या वाढत आहे

राज्यातील अपघाताचा विचार केल्यास 2021 मध्ये राज्यात 29 हजार 477 अपघात झाले होते. यात 13 हजार 528 जणांना जीव गमवावा लागला होता. तर तर 23 हजार 71 प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. तर 2022 मध्ये 33 हजार 383 अपघात होऊन 15 हजार 224 व्यक्तींचा मृत्युू झाला. तर 27 हजार 239 जण जखमी झाले. तर 2023 डिसेंबर अखेर 35 हजार 243 अपघात होऊन 15 हजार 336 जणांचा मृत्यू झाला तर 29 हजार 764 व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

SCROLL FOR NEXT