adulterated paneer seized
जप्त केलेले भेसळयुक्त पनीर pudhari photo
नाशिक

Nashik | सिन्नर एमआयडीसीतील कंपनीतून ३१४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : प्रशासनाने नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या आणखी एका भेसळखोराचा पर्दाफाश केला आहे. सिन्नर एमआयडीसीतील कंपनीत प्रशासनाने धाड टाकत तब्बल ३१४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले. याठिकाणी सर्रास भेसळयुक्त पनीरची निर्मिती केली जात असल्याचे बोलले जात आहे.

सिन्नर एमआयडीसीतील मुसळगाव, स्टाइस वसाहतीतील दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या यशवी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळयुक्त पनीर केले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती. त्यादृष्टीने भेसळखोरांवर अगोदर नजर ठेवण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी (दि. ११) सायंकाळच्या सुमारास सापळा रचून धाड टाकली असता, याठिकाणी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीरचे उत्पादन घेतले जात असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी या कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत सखोल तपासणी केली. त्या ठिकाणी पनीर तयार करताना रिफाइंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर केला जात असल्याचे समोर आले. यावेळी घटनास्थळाहूनच ५३ हजार ३८० रुपये किमतीचे तब्बल ३१४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले.

SCROLL FOR NEXT