house burglary at Deola
फिंगर प्रिंट घेतांना नाशिकचे पथक somnath jagtap
नाशिक

देवळा येथे भरदिवसा 12 लाखांची घरफोडी

पुढारी वृत्तसेवा

देवळा ; येथील ज्ञानेश्वर नगर ( वाखारी रोड ) मध्ये गुरुवारी दि. १८ रोजी भर दिवसा सकाळी ९ वाजेच्या सुमारास धाडशी घरफोडी झाली असून, यात सुमारे दीड लाख रुपये रोख व १५ तोळे सोने असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून , या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • घटनास्थळी नाशिक हुन फिंगर प्रिंट व डॉग पथकाला पाचारण करण्यात आले होते.

  • देवळा पोलिसांनी घटनस्थळी भेट देऊन पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, देवळा येथील ज्ञानेश्वर नगर ( वाखारी रोड) परिसरात राहणारे आदेश बोअर वेलचे संचालक आदेश ठाकरे हे गुरुवारी दि १८ रोजी सकाळी ७ वाजता सहकुटूंब नाशिकला गेले होते. अज्ञात चोरट्याने घर बंद असल्याचा फायदा घेऊन सकाळी ९ वाजेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात व बेड मध्ये ठेवलेले रोख दीड लाख रुपये व १५ तोळे सोने असा सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हडप केला. चोरट्याने घरातील सामान अस्ताव्यस्त केले आहे. ठाकरे यांना आपल्या घरात चोरी झाल्याचा प्रकार आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी सांगितल्यावर ते नाशिक हुन तात्काळ घरी पोहचले.

चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद

या घटनेची खबर त्यांनी देवळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. भर वस्तीत व दिवसा घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून ,त्याचा छडा लावणे आता देवळा पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांनी याची कसून चौकशी करून या चोरट्याचा बंदोबस्त करावा ,अशी मागणी देवळा शहर व उपनगरातील रहिवाश्यांनि केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .

SCROLL FOR NEXT