उत्तर महाराष्ट्र

Nashik : ओझर येथे परराज्यातील मद्यसाठा जप्त, सहाचाकी वाहनही घेतले ताब्यात

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ओझर येथील दहावा मैल परिसरातील कारभारी हॉटेलसमोर कारवाई करून परराज्यातील मद्यसाठा जप्त केला. त्यात पथकाने उत्तर प्रदेश येथील एका संशयिताला पकडले असून, त्याच्याकडून सहाचाकी वाहन व पाच हजार ४०० लिटर मद्यसाठा असा एकूण ५३ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विभागाचे भरारी पथक हे सोमवारी (दि. २७) मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना, एमएच ४३ वाय ९२५१ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली. त्यावेळी त्या वाहनात गोवा राज्यात तयार केलेला मात्र महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा आढळला. त्यामुळे पथकाने वाहनचालक बबलू हरभजन यादव (३९, रा. उत्तर प्रदेश) याला पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी लाखो रुपयांचा मद्यसाठा व वाहन जप्त केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक अ. गो. सराफ, व्ही. एम. पाटील, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT