उत्तर महाराष्ट्र

नाशिक : गोरक्षकांच्या सतर्कतेतून गोवंश वाहतूक फसली

अंजली राऊत

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मुंबई – आग्रा महामार्गाने बेकायदेशीररीत्या जनावरांच्या वाहतुकीचा प्रयत्न गोरक्षकांमुळे उधळला गेला.

गोरक्षक मच्छिंद्र शिर्के आणि भुरा सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि.2) छावणी पोलिसांना माहिती दिली की, देवळा फाट्याकडून मालेगावच्या दिशेने गोवंश असलेली पिकअप (एमएच 18, एम 3395) येत आहे. पोलिस निरीक्षक एस. पी. गायकवाड यांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचार्‍यांनी टेहरे गावाजवळ संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता त्यात चार गोवंश मिळून आले. संशयितांकडे जनावरांच्या खरेदीची किंवा वाहतुकीची पावती आढळून आली नाही. त्यामुळे ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. छावणी पोलिस ठाण्यात शेख भिकन शेख सलीम (रा. संगमेश्वर) व समाधान तुळशीराम पगारे (रा. पंचशील नगर) या दोघांविरोधात हवालदार वासुदेव नेरपगार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT