Valentines day 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात; व्हॅलेंटाइन डे चे लागले वेध 

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

'प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं' फेब्रवारी महिना उजाडताच प्रेमवीरांना व्हॅलेंटाइन डे चे वेध लागतात. त्यानुसार आज मंगळवार दि. 7 पासून व्हॅलेंटाइन वीक ला सुरुवात झाली आहे.

आजपासून प्रेमवीर आवडत्या व्यक्तीकडे आपले मनापासून जडलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तयारी करत आहेत. त्यासाठी बाजारपेठेत विविध हार्ट शेपमध्ये असलेले बलून, गिफ्टस् उपलब्ध झालेले आहेत. ग्रिटींग कार्ड देखील विविध आकर्षक आकारात व प्रेममय संदेशासह आले आहेत. मात्र, सोशल मिडीयावरच तरुणाईचा भर असल्याने ग्रिटींग कार्ड पेक्षा व्हॉटस्ॲप, इन्स्टा आदी ॲपचा वापर केला जात आहे. तर काही प्रेमवीर स्वलिखित काव्य तयार करुन आपल्या व्हॅलेंटाइनला मनवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रेमाच्या आटाेकाट प्रयत्नाची तयारी आजपासून सुरु झाली आहे.

असे आहे व्हॅलेंटाईन वीकचे टाईमटेबल…
❤️ मंगळवार दि. 7 – रोझ डे
❤️ बुधवार दि. 8 – प्रपोज डे
❤️ गुरुवार दि. 9 – चॉकलेट डे
❤️ शुक्रवार दि. 10 – टेडी डे
❤️ शनिवार दि. 11 – प्रॉमिस डे
❤️ रविवार दि. 12 – हग डे
❤️ सोमवार दि. 13 – किस डे
❤️मंगळवार दि. 14 – व्हॅलेंटाईन डे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT