उत्तर महाराष्ट्र

नाशिक : रोजगारासाठी “ट्रान्स्पोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट, १२१ युवकांना ऑफर लेटर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या ऑटो ॲण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो देशासह राज्यात चर्चेचा विषय असून एक्स्पोच्या माध्यमातून नाशिकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रासह संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांतील युवकांना नोंदणी केलेल्यांना जागेवरच नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात मागील चार दिवसांत एक हजार ५२७ तरुणांना नोकरी मिळाली असून, त्यापैकी १२१ जणांना जागेवरच ऑफर लेटर मिळाले आहे.

नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे ठक्कर डोम येथे आयोजित ऑटो ॲण्ड लाॅजेस्टिक एक्सपो पाहण्यासाठी नाशिककरांसह राज्यासह देशातील नामवंत हजेरी लावली. नाशिकचे भौगोलिक स्थान बघता देशाची लाॅजिस्टिक कॅपिटल होण्याची क्षमता आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील त्याबाबत भाष्य केले आहे. मागील तीन दिवसांत तब्बल एक हजार ९३० युवकांनी नावनोंदणी केली. त्यापैकी एक हजार १८६ युवकांच्या हाताला रोजगार मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विशेष म्हणजे देशभरातील २६ नामवंत कंपन्यांमध्ये युवकांना कामाची संधी लाभली. यात 12 हजार रुपयांपासून ते 30 हजारांपर्यंत पगार देण्यात आला. रोजगार मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारी अध्यक्ष पी. एम. सैनी यांच्यासह पदाधिकारी व कौशल्य विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या कंपन्यांनी दिला रोजगार

महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश, एम.एस.एल. ड्राइव्ह लाइट, व्ही.आय.पी., डेटा मॅटिक, टपारिया टूल्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, एम.एन. कॉम्पोनंट यांच्यासह विविध कंपन्यांचा सहभाग आहे.

या पदांसाठी भरती

फिटर, वेल्डर गॅस ॲण्ड इलेक्ट्रिक, मॅकेनिक मोटर व्हेईकल, पेंटर, इलेक्ट्रिशियन, फिटर, डिझेल मॅकेनिक, इलेक्ट्रानिक मॅकेनिक, शिट मेटल वर्कर, टूल ॲण्ड डाय मेकर, वायरमन, १२ वी उत्तीर्ण, डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरिंग, मिलिंग ऑपरेटिंग ॲण्ड प्रोग्रामिंग, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, एमबीए, फायनन्स

एक्स्पो आयोजनाचा हेतू नाशिकला लाॅजिस्टिक कॅपिटल करणे हा आहे. त्याचबरोबर युवकांना रोजगार मिळावा हा हेतू साध्य झाला. नामवंत कंपन्यांमध्ये तरुणांना कामाची संधी मिळाली.

– राजेंद्र (नाना) फड, अध्यक्ष, जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

रोजगार मेळाव्य‍ात नाशिकसह राज्यातील कानाकोपर्‍यातील युवकांनी नावनोंदणी केली होती. तीन दिवसांत एक हजारांहून अधिकांना रोजगार मिळाला.

 

– अनिसा तडवी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT