सायकलवर नर्मदा परिक्रमा,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : तेरा वर्षांच्या ओमची सायकलवर नर्मदा परिक्रमा

गणेश सोनवणे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील बोपाणे येथील 13 वर्षीय ओम शरद हांडगे याने ५५ दिवसांत तब्बल ३८०० किलोमीटरचे खडतर अंतर सायकलने कापत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि समाजासमोर जिद्दीचा एक आदर्श उभा केला.

ओमच्या जिद्दीला प्रेरणा मिळाली, ती त्याच्या वडिलांकडून. त्याचे वडील चांदवडला महावितरण कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी २१ जानेवारी ते २६ एप्रिल या कालावधीत स्वतः नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती. हीच जिद्द ओमने आपल्या वडिलांकडून घेत आपले स्वप्न सत्यात उतरविले. नेमिनाथ जैन विद्यालयामध्ये आठवीत शिकत असलेल्या ओमने आपल्याबरोबर बिछाना व इतर साहित्य घेऊन २१ ऑक्टोबरला नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. अनेक समस्यांचा सामना करत तसेच अरण्यातून मार्गक्रमण करत आपला मार्ग त्यानेच शोधला. निम्मा टप्पा झाला असताना, त्याची सायकल चोरीला गेल्याने तो खचला होता. परंतु ग्रामस्थांनी त्याला नवी सायकल घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मदत केली. त्याने न डगमगता संयमाने ही परिक्रमा १६ डिसेंबरला पूर्ण केली.

नर्मदा परिक्रमा पूर्ण करून गावात त्याचे आगमन होताच रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. ज्ञानेश्वरमाऊली शिंदे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्र्यंबकच्या संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे यांच्या हस्ते ओमचा सत्कार करण्यात आला. संतसेवक दत्तू राऊत, तुकाराम वाजे, संजय ठाकरे, श्याम गांगुर्डे, निळोबा बोरसे, अर्जुन गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, आजोबा वाळूबा हांडगे यांच्या उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला. सत्काराला सारे गाव उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT