उत्तर महाराष्ट्र

नाशिक : महिलेवर अतिप्रसंग प्रकरणी टॅक्सीचालकाला अटक

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

नोकरीवर जाण्यासाठी रोज एका टॅक्सीने जाताना ओळख झाल्यामुळे टॅक्सीचालकाने या ओळखीचा फायदा घेत महिलेवर अतिप्रसंग केला तसेच अश्लील व्हिडिओ काढून या गोष्टीची वाच्यता केली, तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून टॅक्सीचालकाला अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिला ही घोटी परिसरात एका ठिकाणी नोकरीसाठी जात होती. ती नियमित एका टॅक्सीचालकाबरोबर टॅक्सीने जायची. यामुळे पीडित महिलेची टॅक्सीचालक मोहसीन बेग (२५, रा. लेखानगर) याच्याबरोबर ओळख झाली. पीडितेच्या वाढदिवसाचे औचित्य साधत टॅक्सीचालक बेग याने तिला चॉकलेटमध्ये काहीतरी गुंगीचे औषध देत त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील लॉजमध्ये घेऊन जात अतिप्रसंग केला. तसेच यानंतर व्हिडिओ काढून या गोष्टीची वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत यानंतरही अतिप्रसंग केले. बेगला गुरुवारी (दि. 8) न्यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू  आहे. 

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT