उत्तर महाराष्ट्र

नाशिक रोड व्यापारी बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

backup backup

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : येथील नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळविला. विरोधी परिवर्तन पॅनलला दारुण पराभव पत्करावा लागला. नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत पुन्हा एकदा सहकार पॅनलचा डंका वाजल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

रविवारी ( दि. ११ ) नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या महिला गटाच्या दोन जागेंसाठी मतदान झाले.. सोमवारी सकाळी मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून सहकार चे उमेदवार निर्णायक आघाडीवर होते. चौथ्या व अखेरच्या फेरीत निकाल जाहीर झाला .सहकार पॅनलच्या रंजना बोराडे यांना सर्वाधिक ७०६३ तर कमल आढाव यांना दुसऱ्या क्रमांकाचे ६६७८ मते मिळाली. दोघांना विजयी घोषित करण्यात आले. परिवर्तन पॅनलच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांना ३०३६ मते मिळाली. दरम्यान नाशिक रोड व्यापारी सहकारी बँकेत कार्यकारी मंडळाच्या एकूण 21 जागा आहेत.यापूर्वी 19 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहे. महिला गटातील दोन जागेसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होऊ शकली नाही. निकाला नंतर सहकार पॅनलच्या नेत्यांनी एकच जल्लोष साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विजय साजरा झाला. सहकार पॅनलच्या कार्यालयात सहकारचे नेते दत्ता गायकवाड , निवृत्ती अरिंगळे , माजी नगरसेवक दिनकर आढाव यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी फटाके फोडून ,मिठाई वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौतम बलसाने यांनी काम पाहिले.

बँकेचे नवनिर्वाचित संचालक

दत्ता गायकवाड , निवृत्ती अरिंगळे, सुधाकर जाधव,मनोहर कोरडे, सुनील आडके, सुनील चोपडा, रमेश धोंगडे, प्रकाश घुगे, डॉ. प्रशांत भुतडा,श्रीराम गायकवाड, अरुण जाधव, रंजना बिराडे , कमल आढाव ,जगन आगळे, योगेश नागरे, बाबा सदाफुले , नितीन खोले , विजय चोरडिया, वसंत अरिंगळे, गणेश खर्जुल,नितीन पेखळे

बँकेचा इतिहास सभासदांना माहिती आहे. त्यांच्या डोळ्यासमोर झालेली प्रगती त्यांनी पहिली आहे. विरोधकांनी अनेक आरोप केले, बोंबा मारल्या पण जागरुक सभासदांनी आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून दिले. यापुढे बँकेच्या विकासासाठी झटत राहणार असून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवून दाखवू. – दत्ता गायकवाड

विरोधकांनी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अनेक आरोप केले. मात्र सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आमच्या उमेदवारांना मिळालेले मताधिक्य हे आमच्या कामकाजाची पावती आहे.सभासदांचा आमच्यावर विश्वास असून ते आमच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे यानिमित्ताने दिसून येते .यापुढेही बँकेच्या प्रगतीसाठी कायम तत्त्वावर तत्पर असणार आहोत. –  निवृत्ती अरिंगळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT