उत्तर महाराष्ट्र

नाशिक : भाडेतत्वावर चारचाकी घेण्याच्या बहाण्याने 15 लाखांना गंडा

गणेश सोनवणे

नाशिक : कार्यालयीन कामासाठी वाहने घेण्याच्या बहाण्याने १५ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा श्रीधर वाढेकर (४३, रा. संभाजी स्टेडीयमच्या मागे, सिडको) व साक्षीदार जालिंदर भानुदास वाडेकर यांना संशयित संतोष जीवनलाल भावसार (३६, रा. मुंबई) याने करारनामा नोटरी करून ग्लोबल इंटरप्राईजेससाठी दोन एरटीगा भाडेतत्त्वावर घेतल्या. आगाऊ ५५ रूपये न देता दोन्ही वाहने स्वत:च्या ताब्यात घेऊन वाढेकर व वाडेकर यांची फसवणूक केली. वाढेकर यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT