उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पळसेच्या सरपंचपदी प्रिया गायधनी बिनविरोध

अंजली राऊत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
पळसे ग्रामपालिकेच्या सरपंचपदी प्रिया दिलीप गायधनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तलाठी बंडूपुत्र खोब्रागडे, ग्रामविकास अधिकारी उत्तम शेटे हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत होते.

महिनाभरापूर्वी सुरेखा गायधनी यांनी राजीनामा दिल्याने पळसे सरपंचपद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर प्रिया गायधनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकमेव अर्ज दाखल झाल्याने प्रिया गायधनी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी रणदिवे यांनी केली. तर निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळीत, फटाक्यांची आतषबाजी करत 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देत आनंद साजरा केला. यावेळी युवासेनेचे तालुकाप्रमुख नवनाथ गायधनी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, शिवसेना शाखाप्रमुख दीपक गायधनी, मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील गायधनी, मावळत्या सरपंच सुरेखा गायधनी, रत्ना पगार, कमल गायधनी, ताराबाई गायधनी, कांताबाई गायखे, शोभा गायधनी, भीमाबाई चौधरी, रूपाली धोंगडे, किरण नरवडे, उपसरपंच दिलीप गायधनी, अजित गायधनी आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते.

माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला तालुक्यातील सर्वाधिक मोठे गाव असणार्‍या पळसेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन परिवर्तन पॅनलचे नेते विष्णुपंत गायखे यांनी जो विश्वास दाखवला त्याला कदापि तडा जाऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करण्यासाठी मी वचनबद्ध राहणार आहे. – प्रिया गायधनी, सरपंच, पळसे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT