उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा संदेश

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एसएम एज्युकेशन सोसायटी संचलित ग्लोबल व्हिजन स्कूल आयोजित 'एमएच १५ सायक्लोथॉन २०२२-२३' उत्साहात पार पडली. पहाटेच्या गुलाबी थंडीत विद्यार्थ्यांसह पालकांनी सायक्लोथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सायक्लोथॉनच्या माध्यमातून वाहतूक नियमांची अंमलबाजवणी, हेल्मेटचा वापर आणि दिवसागणिक वाढणारे प्रदूषण याविषयी जनजागृती करण्यात आली तसेच आनंदी जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला.

'एमएच १५ सायक्लोथॉन २०२२-२३'साठी अंबड येथील ग्लाेबल व्हिजन स्कूल येथे मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ पवार व गणेश पाटील यांनी सायकल रॅलीचे महत्त्व सांगितले. फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने आणि संस्थेच्या सचिव विजयालक्ष्मी मणेरीकर व शशांक मणेरीकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी एसीपी सोहील शेख, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. मनीषा जगताप, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, किरण चव्हाण, धावपटू शीतल संघवी, आयर्नलेडी अश्विनी देवरे, सीमा कुलकर्णी, सचिन जाधव, अभय कुलकर्णी, श्रीकांत करोदे आदी उपस्थित होते.

अतिशय शिस्तबद्ध अशी ही राइड सर्व नाशिककरांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. अंबड येथे राइडची सांगता झाली. या राइडमध्ये नाशिक सायकलिस्ट्सने महत्त्वाची भूमिका बजावली. या रॅलीमध्ये ३०० सायकलिस्ट्सने सहभाग नोंदविला. संस्थेचे सचिव मणेरीकर यांनी सर्व मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. फाउंडेशनतर्फे ११ हेल्मेट लकी ड्राॅ काढून विद्यार्थ्यांना अध्यक्ष पवार, उपाध्यक्ष पवार व पाटील यांच्या हस्ते भेट देण्यात आले. सहभागी सायकलिस्ट्सना सर्टिफिकेट व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थी पोलिसांच्या भुमिकेत

'एमएच १५ सायक्लोथॉन २०२२-२३'साठी नाशिक सायकल असोसिएशन, इनरव्हील क्लब ऑफ मिडटाउन, संघवी इंडस्ट्री, ग्रॅप काउंटी, रोटरी क्लब ऑफ नाशिक नाइन हिल्स, गिव्ह वेल्फेअर संस्था तसेच नाशिक पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले. या रॅलीमध्ये १२ ते ४५ वर्षे वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकासंह छाेटा पाेलिस म्हणून पार पाडली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT